मुंबई: शिवसेना ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) खोटी आणि बनावट कागदपत्रं सादर केल्याची तक्रार शिंदे गटाने (Eknath Shinde) केला आहे. त्यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अर्ज देण्यात आला असून शिवसेना पक्ष कार्यालयातील कम्पुटर जप्त करण्याची मागणीही केली आहे. शिवसेना 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांसमोर असून त्या दरम्यान शिंदे गटाने ही मागणी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाने बनावट आणि खोटी कागदपत्रं सादर केल्याची तक्रार शिंदे गटाने अध्यक्षांकडे केली आहे. 22 आणि 23 जूनच्या संदर्भात जे ईमेल लेटर दिल्याचं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंनी म्हटलं आहे. तो ईमेल आयडी अस्तित्वातच नसल्याचा युक्तीवाद शिंदे गटाने केला. शिवसेना ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्रं रेकॉर्डवर आणली जात असल्याची अर्जात तक्रार करण्यात आली आहे. विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयातील अनिल देसाई, सुनील प्रभू आणि विजय जोशी यांनी वापरलेले कॉम्पुटर, लॅपटॉप, टॅबलेट मोबाईल आणि इतर संपर्काची साधने जप्त करण्याची केली मागणी करण्यात आली आहे.
अध्यक्षांसमोर ठाकरे गटाकडून बनावट कागदपत्रे सूपर्द करण्यात आल्याप्रकरणी शिंदे गटाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्र रेकॉर्डवर आणली जात असल्याची अर्जात केली तक्रार करण्यात आली. ज्या ईमेल आयडीवर एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे, तो ईमेल आयडी ही अस्तित्वात नसल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. या ईमेल आयडीवर ई-मेल करून बाउन्स बॅक झालेल्या मेलचा रिपोर्ट देखील अध्यक्षांना या पत्रात जोडला आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी पार पडली होती. त्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांची पुन्हा साक्ष घेणं सुरू आहे. मागील आठवड्यातील सुनावणीमध्ये 21 जून 2022 रोजी ठाकरे गटाने बजावलेल्या व्हिपसंदर्भात तसंच 21 जूनला घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाने जो ठराव मांडला होता, त्यासंदर्भात अनेक प्रश्न, उपप्रश्न सुनील प्रभू यांना विचारण्यात आले होते.
आतापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये सुनील प्रभू यांनी जारी केलेला 21 जून 2022 रोजी चा व्हीप, बैठकीतील ठराव, बैठकीतील आमदारांनी ठरावाला दिलेला अनुमोदन त्यांच्या सह्या या संदर्भात अनेक प्रश्न उपप्रश्न शिंदे गटाच्या वकिलांकडून विचारण्यात आले. त्यासोबत 31 ऑक्टोबर 2019 रोजी ज्या बैठकीत गटनेता म्हणून एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड झाली ती निवड शिवसेना पक्षाचे आमदारांनी केली असून पक्षप्रमुख पक्षात कुठलेही पद शिवसेना पक्षाच्या घटनेत नसल्याचा शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान नमूद केलं.
ही बातमी वाचा: