बीड : आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्या घरी जाळपोळ करतानाचा नवा व्हिडिओ (New Video) आता समोर आलाय. 30 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये (Beed) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून दगडफेकाने जाळपोळ करण्यात आली होती. यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरी गाड्यांची जाळपोळ आणि त्यांच्या घरावर  दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान आता या प्रकरणातला आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये जमाव संदीप क्षीरसागर यांच्या घरामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. नंतर या जमावाने घरावर दगडफेक केली आणि दगडफेकी नंतर घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावली,  हे या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे.


बीडमध्ये घडलेल्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. जमावाने जी जाळपोळ केली होती, पेट्रोल पंप आणि इतर काही साहित्याचा वापर झाल्याच्या प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी दिल्या होत्या.  मात्र संदीप क्षीरसागर यांच्या घरावर जेव्हा जमाव गेला तेव्हा या जमावाकडे कुठल्याही प्रकारची पेट्रोल पंप किंवा इतर साहित्य नसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.  या जमावाने सुरुवातीला घरावर दगडफेक केली आणि त्यानंतर एका एका गाडीला आग लावल्याचं व्हिडिओतून स्पष्ट झाल्यांचं म्हटलं जातं आहे. 


नेमकं प्रकरण काय?


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच काहींकडून नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केलं गेल्याचं देखील पाहायला मिळालं. 30 ऑक्टोबर रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला केला होता. आक्रमक आंदोलकांनी क्षीरसागरांच्या बंगल्याच्या आवारत मोठी जाळपोळ केली होती. याबाबत संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न देखील उपस्थित केले होते. 


तरुणांचा समावेश


दरम्यान ज्या लोकांनी क्षीरसागरांच्या घरी हल्ला केला त्यामध्ये 25 वयोगटातील तरुण असल्याचं म्हटलं जात होतं. त्यांच्या हातामध्ये  दगड, काट्या आणि ज्वलनशील पदार्थ असल्याचा आरोपही करण्यात आला होता.  विशेष म्हणजे यातील बरेच तरुण हे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात होते. बीड शहरातील जाळपोळ प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या हाती पाच अल्पवयीन तरुण सुद्धा लागले हे पाच अल्पवयीन याच जमावामध्ये सहभागी झाले होते. 120 तरुणांमध्ये बहुतांश तरुण 25 ते 30 वयोगटातील असल्याचं समोर आलं होतं. 



हेही वाचा : 


Beed Maratha Protest : बीडच्या जाळपोळीच्या घटनेचा मास्टरमाईंड कोण? जयदत्त क्षीरसागर यांचा सवाल