Shiv Sena Mp Hemant Patil : महाविकास आघाडीत असल्यामुळे शिवसैनिकांचे 100 टक्के नुकसान होत आहे, अशी खंत शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्ती केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आपली होत असलेली घुसमट व्यक्त करताना हेमंत पाटील म्हणाले की, 'राज्यातील या आघाडीमध्ये आमचा वापर करून घेतला जात असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या कानावर काही बाबी घातल्या आहेत.' यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. हेमंत पाटील आज नांदेड मध्ये बोलत होते


उध्दव ठाकरे मुख्यमंत्री नसले असले तर तुम्ही कुठे असता? असा सवाल करत खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असा कुणीही गर्व करु नये.  अशी टीका शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली. चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असं म्हटलं होतं, त्याला पाटील यांनी प्रतिउत्तर दिलेय. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये आमचं शंभर टक्के नुकसान होत आहे. आमचा वापर केला जात असल्याची खंत व खदखद शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलीय. या बाबी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. केवळ उध्दव ठाकरे यांचे आदेश आहेत, त्यामुळे सगळं सहन करत असल्याचं वक्तव्य पाटील यांनी केलंय.


अशोक चव्हाण काय म्हणाले होते?
 'राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे', असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा (Congress) मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रमाणिक भूमिका असल्याचेही अशोक चव्हाण म्हणालेत. जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.  राज्याचा विकासाचा गाडा हा पुढे चालत राहीला पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीचे सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. स्थानिक पातळीवर जरी आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही. मात्र, राज्य व्यवस्थीत चालले पाहिजे, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असल्याचेही ते म्हणाले. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयान जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा झाल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.