Majha Katta : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान अतुलनीय शौर्य दाखवणारे वसई विरार आणि भायंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta)  अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा हॉस्पिटलमध्ये सदानांद दाते यांनी  निडरपणे कसाब आणि  इस्माईलशी दोन हात केले. अगदी तुटपुंज्या साधनांसह एके-47 च्या माऱ्याला थोपवलं. त्यांच्या धाडसामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले. सदानंद दाते यांच्या या शौर्याचा गौरव राष्ट्रपती पदकाने करण्यात आला. पुढे त्यांनी सांभाळलेली फोर्स वनची जबाबदारी, नक्षलवाद्यांचं प्राबल्य असलेल्या छत्तीसगढमधील त्यांचं काम तसेच मुंबई सह-पोलीस आयुक्तपदाच्या कारकिर्दीतील काम विशेष उल्लेखनीय आहे. मागील 30 वर्षांपासून सदानंद दाते पोलीस सेवेंमध्ये कार्यरत आहेत. पोलीस सेवेत असताना त्यांनी घेतलेल्या अनुभावचं वर्णन त्यांनी आपल्या  "वर्दीतील माणसांच्या नोंदी"  या पुस्तकात केलं आहे. माझा कट्ट्यावर सदानंद दाते यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केलाय.


पोलीस सेवेत कसे आले?
कॉलेजमध्ये शिकत असताना युपीएससी संदर्भात समजलं. त्यावेळीच मी पोलीस सेवेत जायचं ठरवलं होतं. कारण तरुण वयात मोठ्या पदावर काम करण्याची संधी युपीएससी मार्फत मिळते. आपण समाजासाठी काही तरी करु शकतो. समाजातील अनेक प्रश्नावर आपण काम करु शकतो, असं वाटलं होतं. त्यामुळे युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक व्यक्तीला सिस्टिममध्ये बदल हवा असतो. पण त्यासाठी आपल्याला त्या सिस्टिममध्ये जावं लागते. ते करण्याचं मी ठरवलं होतं. युपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आयएएस, आयपीएस आणि (IA&AS) असे तीन पर्याय दिले होते. कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर पोलीस होईल असं कधीच वाटलं नव्हतं. मात्र, युपीएससी केल्यानंतर पोलीस व्हायचं ठरवल्याचं दाते यांनी सांगितलं.


लहानपण कसं होतं?
लहानपण संघर्षात गेलं. कारण आठवीत असतानाच वडिलांचं निधन झालं होतं. माझी आई खूप जिद्दी होती. वडिलांचं निधन होण्यापूर्वी तीन-चार वर्ष ते आजारी होते. तेव्हापासूनच आई इतरांच्या घरी स्वयंपाकाची काम करत आम्हाला शिकवलं. छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या. 1977 पासून ते 1988 पर्यंत पुण्यात वर्तमानपत्र टाकण्याचं काम केलं.  काही ठिकाणी शिपाई म्हणूनही काम केलं. तेव्हा गरीब असल्याचं कधी वाटलं नाही. कारण समोर प्रॉब्लेम होते. आई नेहमी म्हणायची तुम्ही शिकायला पाहिजे. शिक्षणासाठी काही कमी पडणार नाही, याची सर्व काळजी आईने घेतली होती. तेव्हा असा स्ट्रगल वैगरे काही वाटलं नाही, कारण ते आयुष्य होतं. पण आता माघारी पाहिल्यानंतर स्ट्रगल केल्याचं वाटतं, असे सदानंद दाते म्हणाले.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 



सदानंद दाते 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नव्याने झालेलं मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालायाचे सदानंद दाते हे पहिले पोलीस आयुक्त आहेत. 2008 साली मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सदानंद दाते यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. यासाठी त्यांना राष्ट्रपती पदकही मिळालं होतं. तसेच एक धाडसी अधिकारी म्हणून सदानंद दाते यांची ओळख आहे.