Shirdi Sai Baba: महाराष्ट्रात (Maharashtra) तील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट पाहता घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यानंतर, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिर्डीतील साई मंदिर ऑनलाईन पास देत दर्शनास खुले करण्यात आले. त्यानंतर साई संस्थानने साई मंदिरात ऑफलाईन पास सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवलीय होती. आता साईभक्तांना ऑनलाईनसह ऑफलाईन पास मिळण्यास सुरुवात झाली आहे.


सुरवातीला दररोज 15 हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने पास मिळत होते मात्र आता ऑनलाईन पास बरोबरच ऑफलाईन पास सुविधा उपलब्ध झाल्याने भविकांना दिलासा मिळालाय. आता दररोज 25 हजार भाविक साई दर्शन घेणार असून यात 15 हजार ऑनलाईन तर 10 हजार भाविक ऑफलाईन पास मिळणार आहे.


कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे 17 मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने 14 नोव्हेंबरला पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी येथील मंदिर उघडण्यात आले. त्यानंतर शिर्डीच्या साई मंदिरातही भाविकांना ऑनलाईन प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, या काळात भाविकांची गैरसोय होत असल्याचे साई संस्थानच्या लक्षात येताच त्यांनी भाविकांना ऑफलाईन प्रवेश सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.


श्रद्धा-सबुरीचा मंत्र देणाऱ्या शिर्डीत भाविक नियमांच्या अटींमुळे बेहाल


शिर्डी साईबाबांचे मंदिर भाविकांना खुले झाले असले तरी अनेक दिवसांपासून साईदर्शनासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय. ऑनलाइन पासची सक्ती, 10 वर्षाखालील खालील मुलांना दर्शनासाठी मनाई असल्याने भाविकांमध्ये असंतोष दिसुन येतोय. आपल्या 10 वर्षा खालील लहान मुलाला दर्शनासाठी घेऊन आलेल्या पालकांना जिथे जागा मिळेल तेथे रस्त्यावरच थांबून दर्शनासाठी वाट पाहावी लागण्याची वेळ आलीय.


राज्य सरकारने 65 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना दर्शनासाठी परवानगी दिली आणि त्याची अंमलबजावणीही शिर्डी साईबाबा संस्थानने केलीय. मात्र अद्याप 10 वर्षाखालील मुलांना बंदी कायम ठेवल्याने पालकांना मुलांसह मंदिर दर्शन रांगेबाहेरच थांबण्याची वेळ येत आहे. 10 वर्ष खालील मुलाला एकटे घरी ठेवता येत नाही आणि दर्शनाला आल्यावर त्याला बाहेरच ठेवणायची वेळ शासनाच्या नियमांमुळे भविकांवर आलीय. पालकांना दर्शनाला जाताना एकत्र जाता येत नाही. एकाला आधी जावं लागतं आणि आत जाऊन आल्यावर दुसऱ्याला जाण्याची वेळ पालकांवर आलीय. या मधल्या काळात बसण्याची कुठेही व्यवस्था नसल्यानं दर्शन रांगेबाहेरच रस्त्यावर घेऊन मुलांना बसल्याचे चित्र शिर्डीत दिसून येत आहे. यामुळे भाविकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे.


संबंधीत बातम्या


Shirdi Saibaba Sansthan : शिर्डीत भाविक नियमांच्या अटींमुळे बेहाल


Shirdi Saibaba Temple : लवकरच शिर्डीच्या साईबाबांचे ऑफलाईन दर्शन घेता येणार


Shirdi Saibaba : लवकरच साई मंदिरात ऑफलाईन दर्शन सेवा सुरू होणार