शिर्डी: दिवाळीच्या प्रकाशोत्सवात साईबाबांची शिर्डीही न्हाऊन निघाली आहे. देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. साईबाबा हयात असताना एका दिवाळीत त्यांनी पाण्यानं दिवे प्रज्वलित केल्याची एक अख्यायिका सांगितली जाते. याच अख्यायिकेनुसार बाबांची शिर्डी दिवाळीच्या काळात लखलखत्या दिव्यांनी सजवली जाते. त्यासाठी साईमंदिर परिसरात भाविक दिवे लावून अवघा परिसर सजवून टाकतात.




देशभरातून आलेले हजारो भाविक मंदिर परिसरात दिव्यांचा झगमगाट करून साईबाबांनी सुरु केलेली प्रथा जोपासत असून दिपावलीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस दीपोत्सव साजरा केला जातो.

दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा शिर्डीत सुरु असून आपल्यात असणारे दुर्गुण निघून जावो या साठी भाविक या ठिकाणी येऊन दिवे लागत असल्याची माहिती साई मंदिरचे प्रमुख गुरु बा. रा. जोशी यांनी दिली.