Shinde Faction MLA Fight : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना शिंदे गटामधीलच आमदार महेंद्र थोरवे यांच्यात आज (1 मार्च) विधानसभेच्या लॉबीमध्येच धक्काबुक्की झाल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला असतानाच आता थेट विधानसभेच्या प्रांगणामध्येच एक मंत्री आणि एक आमदारामध्ये थेट धक्काबुक्की झाल्याने संतापाचा कडेलोट झाला आहे. 






झालेला वाद लपवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र जो प्रकार घडला त्यानंतर आता सडकून टीका सुद्धा होत आहे. शिवसेना ठाकरे गटाने दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्या धक्काबुक्कीवर सडकून टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ट्विटरवरून शिंदे गटावरती हल्लाबोल करण्यात आला आहे. 


ट्विटमध्ये म्हटले आहे की, सत्तेच्या मलिद्यासाठी एकत्र आलेले बोके आता एकमेकांना धक्काबुक्की करु लागले आहेत. स्वतः बदनाम आहेतच पण ह्यांनी महाराष्ट्रालासुध्दा पुर्ण बदनाम करण्याचं ठरवलंय!






दरम्यान दरम्यान शरद पवार गटाकडूनही शिंदे गटामध्ये झालेल्या धक्काबुक्कीवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ट्विट करून पत्रास कारण की म्हणत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. या पत्रामध्ये म्हटलं आहे की, विधिमंडळ म्हणून मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे पण तुम्ही सत्तेवर आलात आणि माझ्याच आवारात कार्यरत आहात ते स्वतःच्या मंत्रिपदाचे खुर्चीचे आणि सत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याच आवारातल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जाऊन आपण अभिवादन करता पण इमारतीत येऊन मात्र गॅंगवर करता. सबंध महाराष्ट्र मोठ्या आशेनं माझ्याकडे पाहतो पण जेव्हा रस्त्यावरचे गॅंगवरच माझ्या आवारात घडतं तेव्हा गेले अनेक वर्ष बाळगलेल्या माझ्या स्वाभिमानाला तडा जातो. महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्ष म्हणजे मी आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण बदलाचे निर्णय झाले ते माझ्याच आवारात. 


इतर महत्वाच्या बातम्या