SSC Exam Copy : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत (HSC Exam) अनेक ठिकाणी बिनधास्तपणे कॉपी (Copy) सुरु असल्याचे पाहायला मिळत असतानाच, आजच्या दहावीच्या पहिल्याच (SSC Exam) पेपरला देखील कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाहेर कॉपीचे प्रकार समोर आले असून, यामुळे पोलीस यंत्रणा, परीक्षा केंद्र संचालक या सर्वांची यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 


आज दहावीचा पहिला पेपर होता. मराठी विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्राबाहेर गर्दी पहावयास मिळाली. लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाहेर कॉपी पुरविण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रशासनाने उभी केलेली भरारी पथक पोलीस या सर्वांची यंत्रणा अक्षरशः फोल ठरली असल्याचे दिसून येत आहेत. धक्कादायक म्हणजे प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असतांना देखील कॉपी सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. 


लातूर जिल्ह्यातील 39 हजार 71 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातायत...


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यातील 39 हजार 71 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. बोर्डाच्या वतीने 153 केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय जीवनात दहावीची परीक्षा महत्त्वाची समजली जाते. आज सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मराठी विषयाचा पेपर होत आहेत. लातूर विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने 22 परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, असे असतांना देखील उघडपणे कॉपीचे प्रकार सुरु आहेत. 


जालन्यात थेट भिंतीवर चढून कॉपी पुरवण्याचा प्रकार...


दरम्यान असाच कॉपीचा प्रकार जालना जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत देखील समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील मंठा येथील रेणुका विद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला होता. गुरुवारी बारावी रसायनशास्त्राचा पेपर असतांना वरील परीक्षा केंद्रावर खिडक्यांमधून सर्रास कॉपी पूरवतानाचे दृश्य पाहायला मिळाले होते. परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा अक्षरशः खच पडला होता. तर, केंद्रावर पोलीस बंदोबस्त असतांना देखील बिनधास्तपणे कॉपी पुरवल्या जात होते. त्यामुळे कॉपी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले भरारी पथक आहेत तर कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


HSC Exam : कोणी शाळेच्या भिंतीवर, तर कोणी झाडावर चढून पुरवतोय 'कॉपी'; जालन्यातील धक्कादायक व्हिडिओ आला समोर


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI