कराड : 'शिवसेना फसव्या लोकांबरोबर राहते कशाला. जर एकत्र नांदता येत  नसेल तर वेगळे व्हा.' अशी थेट टीका शरद पवारांनी शिवसेनेवर केली आहे. नुकतीच भाजप सरकार फसवं असल्याची टीका उद्वव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतला. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘भाजप सरकार फसवे आहे हे उद्धव ठाकरे म्हणतात हाच मोठा विनोद आहे. फसव्या लोकांबरोबर तुम्ही राहता कशाला?, एकत्र नांदायचं नसेल तर वेगळे व्हा.’ अशा शब्दात पवारांनी शिवसेनेवर टीका केली.

याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. ‘गुजरातमध्ये भाजपाबद्दल नाराजी आहे. पण या निवडणुकीत गुजरातमध्ये सत्ता आणि पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल.’ असा दावा पवारांनी केला.

दरम्यान, सध्याच्या सरकारमधून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रकार घडत आहेत. याला जोरदार विरोध करण्यासाठी 35 वकिलांची टीम तयार केल्याची माहितीही पवारांनी दिली.

संबंधित बातम्या :

गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक

उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीत नेमकं काय झालं?