Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर पक्षाची लढाई निवडणूक आयोगामध्ये जाऊन पोहोचली होती. यावेळी दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रे सुद्धा सादर करण्यात आली होती. दोन्ही गटांकडून लाखोंवर प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगात सादर करण्यात आली होती. ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली, त्याच पद्धतीने आमदार खासदार पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रतिज्ञापत्रे सादर केली. निवडणूक आयोगाने मुळ पक्ष आणि विधीमंडळ पक्ष याचा कोणताच फरक न करता अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष बहाल करून टाकला. निवडणूक आयोगाकडून जे धोरण शिवसेनेसाठी राबवण्यात आले तेच धोरण राष्ट्रवादीसाठी राबवण्यात आले.
दोन्हीकडे प्रतिज्ञापत्र देणारे एकमेव खासदार अन् ते पाच आमदार कोण?
यामध्ये दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रे दिली होती त्यांची सुद्धा नावे समोर आली आहेत. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीमधील पाच आमदार व एकमेव खासदार असे होते ज्यांनी दोन्हीकडे प्रतिज्ञापत्र देऊन प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेतला होता का? अशी आता चर्चा रंगली आहे. यामध्ये एकमेव खासदार अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. दुसरीकडे आमदारांमध्ये चेतन तुपे, किरण लहानमठे, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक आणि अशोक पवार यांनी दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर केल्याने भूवया उंचावल्या गेल्या आहेत. दुसरीकडे आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सुरुवातीला अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर पुन्हा नंबर शरद पवार गटाला काउंटर प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
काउंटर प्रतिज्ञापत्रांमध्ये आमच्याकडून दिशाभूल करून अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप अमोल कोल्हे आणि अशोक पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रतिज्ञापत्र शरद पवार यांच्या आदेशाने घेतले जात असल्याचे सुरुवातीला सांगितले. प्रत्यक्षात मात्र आमची दिशाभूल करण्यात आली असा सुद्धा आरोप करण्यात आला आहे.
शरद पवार गटाला नाव मिळाले
इतर महत्वाच्या बातम्या