मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून पक्षाला रामराम केल्याची घोषणा केली. सिद्दीकी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मी तरुणपणी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे आहे असे बरेच काही आहे, परंतु या म्हणीप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या जातात. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.
बाबा सिद्दीकी काँग्रेस सोडताच काय म्हणाले?
काँग्रेसला सोडचिट्टी दिल्यानंतर बाबा सिद्दीकी म्हणाले की, मी इतकी वर्ष या परिवारात राहिलो आहे. या परिवारात होणाऱ्या घडामोडी विरोधात मी इतके वर्ष बोललो त्या माध्यमांवर सांगू शकत नाही. मी राजीनामा दिला असून कारण न बोललेलं बरं. झिशानचा निर्णय त्यांना विचारा. मी जिथे जाईन तिथं पक्षासोबत पीसी घेईन. 10 तारखेला एक सभा होईल, माझ्याबरोबर असणारे लोकं त्यामध्ये येतील. अजित पवार हे कौतुकासारखेच आहेत. अजित पवार आपल्या सर्व लोकांकडे लक्ष ठेवतात हे त्यांचं मोठेपणा आहे, आगे आगे देखो होता है क्या असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, माझा संबंध राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी आणि खर्गे यांच्या सोबत अनेक वर्ष राहिला आहे. मला पक्ष सोडताना कोणी कॉल केला हे सांगणं उचित नाही. मी हा निर्णय अचानक घेतलेला नाही. याबाबत मी वरिष्ठांना पंधरा-वीस दिवसापूर्वीच कळवला आहे. माझी देखील मजबुरी आहे त्यामुळे हा निर्णय घेतला. दुःख तर होतं आहे, पण ते शोधा कोणामुळे. कोणत्याही गोष्टीबाबत मला कमिटमेन्ट केलं नाही. झिशन त्याचा निर्णय तो स्वतः घेईल. काही नोटीसा वैगेरे मला नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा
दरम्यान, बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान यांनीही अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. बाबा सिद्दीकी हे वांद्रे विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत आणि ते महाराष्ट्रातील मोठ्या मुस्लिम चेहऱ्यांपैकी एक आहेत.
मिलिंद देवरा यांनीही काँग्रेस सोडली
बाबा सिद्दीकी यांच्या आधी माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. 47 वर्षीय मिलिंद देवरा यूपीए-2 च्या कार्यकाळात काही काळ मंत्री होते. मिलिंद देवरा यांनी ट्विट करून पक्ष सोडल्याची माहितीही दिली होती. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या