मुंबई: आजवर छोट्या राज्यांची भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादीनं अचानकपणे अखंड महाराष्ट्रासाठी उभे राहण्याचा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखंड महाराष्ट्राच्या पाठिशी उभे राहण्याचा आदेश नेते, कार्यकर्त्यांना दिला आहे.

 

थोड्याच वेळापूर्वी पवारांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पवारांनी अखंड महाराष्ट्र ही काळाची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच वेगळा विदर्भ हवा असल्यास त्यासाठी जनमत घेणं गरजेचं आहे. कारण की, जनमत घेतल्याशिवाय वेगळ्या विदर्भाची मागणी करणं हा विदर्भावरच अन्याय होईल. असंही पवार म्हणाले.

 

तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र अखंड महाराष्ट्रावरुनच दोन गट पडले आहेत. अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडण्याच्या तयारीत असलेल्या राणे, विखे आणि कंपनीची तक्रार आपण हायकमांडकडे करणार असल्याचं माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ दोन गटात विभागल्याचं दिसतं आहे.

 

संबंधित बातम्या:

 

मुंबईतले खड्डे बुजवता आले नाही ते विदर्भाचा विकास काय करणार?: श्रीहरी अणे

 

काँग्रेस-राष्ट्रवादीने अखंड महाराष्ट्र शिकवू नये : शिवसेना

 

मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : फडणवीस