सिंधुदुर्ग : कोकणचा माणूस प्रेमळ आणि सरळ आहे. पण एखादी गोष्ट पटली नाही, तर तो आजिबात ऐकत नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांना सावध केलं आहे.
सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या हॉस्पिटलचं पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते.
संपूर्ण कोकणातील अत्याधुनिक अशा लाईफटाईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, विनोद तावडे, राम शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंवर स्तुतीसुमनं उधळली.
वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जेदारच्या सुविधा असलेले लाईफटाईम हॉस्पिटल 82 एकर परिसरात पसरले आहे. ज्या जनतेने मला मोठे केले त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरिता हॉस्पिटलचा हा भव्य दिव्य प्रकल्प उभारल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
मोठ्या शहरामध्ये ज्या सुविधा उपलब्ध होत नाहीत अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा राणेंनी ग्रामीण भागातील आपल्या जनतेकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. राणे हे एक व्हिजन असलेले नेते आहेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेंचे कौतुक केले. या हॉस्पिटलच्या निमित्ताने मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून पर्यटन व रोजगार दोन्ही उपलब्ध होतील असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर कोकणी माणूस ऐकत नाही : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 May 2018 05:29 PM (IST)
"वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जेदारच्या सुविधा असलेले लाईफटाईम हॉस्पिटल 82 एकर परिसरात पसरले आहे. ज्या जनतेने मला मोठे केले त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरिता हॉस्पिटलचा हा भव्य दिव्य प्रकल्प उभारला आहे."
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -