मुंबई : कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेवरुन सध्या राज्यात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. पण दोन्ही घटना वेगळ्या आहेत. कोरेगाव भीमात हिंसाचाराआधी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंनी वातावरण निर्मिती केल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी आज केला. एल्गार परिषद, भीमा कोरेगाव यांचा संबंध नाही. तर, एल्गार परिषदेत शंभरहून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या. उपस्थित नसलेल्या अनेकांवर गुन्हे दाखल झाल्याची टीकाही पवारांनी केली.


शरद पवार म्हणाले,एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा यांचा संबंध नाही. त्यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. एल्गार परिषदेत काही भाषणं केली गेली. 100 पेक्षा अधिक संघटनांचा सहभाग होता. अध्यक्षपद पी.बी सावंतांकडे होतं. पण ते न आल्यानं प्रकाश आंबेडकरांनी अध्यक्षपद भूषवलं. अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, हजर नसलेल्या लोकांवर पोलिसांनी खटले भरले आणि आणि त्यांना तुरूंगात टाकलं. पोलिसांनी खटले भरलेल्यांपैकी फक्त सुधीर ढवळे परिषदेला हजर होते.  सुधीर ढवळे उपस्थित होते. सुधीर ढवळेंनी नामदेव ढसाळांची कविता एल्गार परिषदेत वाचली म्हणून त्यांच्यावर खटला. ती कविता समाजातील उपेक्षित वर्गावर आहे. असा वर्ग ज्याच्यावर अत्याचार होतात, अशा वर्गाविषयी तीव्र भावना व्यक्त करणारी ती कवीता आहे.

मुंबईत  याबाबत आढावा बैठक सुरू असताना केंद्राला कोणी माहिती दिली?  जे अधिकरी बैठकीला होते त्यांनी हा उद्योग केले का? असा सवाल देखील शरद पवार यांनी या वेळी उपस्थित केला.

शरद पवार म्हणाले, राज्य शासनाने जे करायचं ते करावं त्यात मी बोलणार नाही. पण हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे. मी गृहमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केलं, सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अधिकाराचा गैरवापर करून कुणाला तुरुंगात टाकणे हे चिंताजनक आहे. राज्य सरकारला मान्यता दिल्याशिवाय पर्याय नाही. पण कायद्यात तरतूद आहे. माझी मागणी एल्गार परिषद प्रकरणी सत्तेचा गैरवापर झाला त्याची चौकशी झाली पाहिजे. राज्य सरकारला चौकशी करायचा अधिकार आहे.

एल्गार प्रकरणी चौकशी पुणे पोलीस, त्यांचे वरिष्ठ त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन चिंताजनक आहे. हा महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक नाही. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बैठक बोलवले, अधिकारी होते. चर्चा सुरू होती. दिल्ली इतकी जागृत आहे, ह्यांच्या बैठकीत काय झालं हे चार तासात त्यांना कळलं याची राज्य सरकारने दखल घ्यावी. लोकशाही आहे, सरकार त्यांचं काम करेल. परंतु आमच्या सारखी लोक जे करता करायचं ते करत राहतील. त्यांनी संबंध देशाची निवडणूक घ्यावी ,आम्ही तयार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Special Report | कोरेगाव-भीमाची समांतर चौकशी? | ABP Majha



NPR ला संसदेत आम्ही विरोध केला. आता तर येथे आघाडी आहे, आम्ही चर्चा करू.पंतप्रधान जीवाला धोका अस तेव्हा सांगण्यात आलं होतं. हे हास्यास्पद होतं. केंद्र आणि राज्य सरकार त्यांचं होतं काय तपास केला? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. पंतप्रधान होते, ते सुप्रीम होते, त्यात लक्ष दिले पाहिजे.

शरद पवार म्हणाले, आमचं आघाडी सरकार आहे, वेगळ्या विचारधारा आहेत,कॉमन मिनिमम कार्यक्रम वर काम होतं. दिल्लीत आम्ही तस काम केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा विकासासाठी आग्रही आहे.

संबंधित बातम्या : 

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार हे दोन वेगळे विषय : मुख्यमंत्री

शिवसेना-राष्ट्रवादीत काय चाललंय? महाविकास आघाडीत सगळं सुरळीत आहे का?