पुणे : ख्रिश्चनांचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कोणतंही योगदान नव्हतं, असं वक्तव्य भाजपच्या खासदाराने केलं. त्यांना हे माहित असावं, की काँग्रेसची स्थापना देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाली होती आणि या स्थापनेमध्ये एनी बेझंट यांची महत्त्वाची भूमिका होती, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप खासदार गोपाळशेट्टींवर निशाणा साधला.


भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळशेट्टी यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतातील ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश होते. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नव्हता, असं वक्तव्य गोपाळशेट्टींनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलं. शिवाय आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही ते म्हणाले.

गोपाळ शेट्टी यांचं ख्रिश्चनांबाबतचं वक्तव्य काय?

भाजप खासदार गोपाळ शेट्टी एका वादग्रस्त विधानामुळं चर्चेत आले  आहेत. भारतातील ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश होते, त्यामुळं त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नव्हता असं वक्तव्य खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलं आहे. याबाबतचा त्यांचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या मालवणीत शिया कब्रस्तान कमिटीमार्फत आयोजित एका कार्यक्रमात शेट्टी बोलत होते.

यावेळी त्यांनी भारतातील हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र लढले. दोन्ही समुदायांनी मिळून भारत स्वतंत्र केला. स्वातंत्र्य लढ्यात कोणी हिंदू-मुस्लिम म्हणून नव्हे तर हिंदुस्थानी म्हणून लढले, असं सांगतानाच त्यांनी दोन्ही समुदायावर स्तुतीसुमनं उधळली.

दरम्यान दोन व्यक्तींनी खासदार शेट्टी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गोपाळ शेट्टी नेमकं काय म्हणाले?

आज हर एक व्यक्ती को लगना चाहिए की ये देश हमारा है | आपका है, हमारा है, हम सब का देश है

मौलवी साब ने बताया, ये देश को हिंदूओने आजाद नहीं किया है, ये देश को कोई मुसलमानोने आजाद नहीं किया है,

ख्रिश्चन लोग तो ऑलरेडी थे, तो वो लडाई में थे ही नहीं

ये दोनो (हिंदू-मुस्लिम) समाज थे, तब हमने आजादीके लिए हिंदुस्तानी करके लडा था| हिंदू और मुसलमान करके लडे नहीं है|

हमें मिलके देश को आगे लें जाना पडेगा क्योंकी हमारे देश के प्रधानमंत्रीजी का नारा है, सबका साथ, सबका

विकास..वो यहीं है|

में जो भी करुंगा देशवासियों के लिए करुंगा

हिंदू के लिए करुंगा, मुसलमान के लिए करुंगा ये नहीं

कोई भी खडा होकर बोल सकता है, की मोदी साबने मुसलमानो के लिए ये खराब किया और हिंदुओ के लिए ये अच्छा किया?

पाहा व्हिडीओ :