*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/07/2018*


 

  1. नागपुरात तुफान पाऊस, वीज गेल्याने पावसाळी अधिवेशनाचं आजचं कामकाज पाण्यात, मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी, विरोधकांची सरकारवर टीका https://goo.gl/RdN4yr


 

  1. मुसळधार पावसामुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत, तीन तासात 162 मिलीमीटर पावसाची नोंद, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, उद्या शाळांना सुट्टी https://abpmajha.abplive.in/


 

  1. काँग्रेसने घोटाळ्याचा आरोप केलेल्या नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला स्थगिती, मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा https://goo.gl/E7ESJF


 

  1. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत प्रगती का नाही?, हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं, एसआयटीच्या कामाचं मॉनिटरिंग न्यायमूर्ती करणार https://goo.gl/BqzANZ


 

  1. माझं आणि उद्धवसाहेबांचं रिलेशन चांगलं, शिवसेना-भाजप युती टिकवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरेन, रासप नेते महादेव जानकर यांचं वक्तव्य https://goo.gl/hS41jd


 

  1. भाजप खासदार गोपाळ शेट्टी राजीनाम्याच्या तयारीत, ख्रिश्चन समुदायावरील विधानानंतर पक्षाने झापल्याची चर्चा, तर राजीनामा घेणार नाही, भाजपची भूमिका https://goo.gl/KPgvp6


 

  1. अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपपत्र दाखल, आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर यांना तात्पुरता दिलासा, 1 हजार 366 पानांच्या आरोपपत्रात 10 पैकी 8 जणांचा समावेश https://goo.gl/uebuQn


 

  1. खंडाळ्याजवळ एक्सप्रेसचा घसरलेला डब्बा हटवला, मात्र रेल्वे रुळ खचल्याने मुंबई-पुणे वाहतूक अजूनही ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल https://goo.gl/VZ1RoY


 

  1. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दहा तर मुलगी मरियम यांना सात वर्षांचा तुरुंगवास, भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा https://abpmajha.abplive.in/


 

  1. धार्मिक स्थळी गैरसोय, मंदिर प्रशासनाचा ढिसाळ कारभार असेल, तर भाविकांना जिल्हा न्यायाधीशांकडे तक्रार करता येणार, ओदिशातील जन्ननाथ मंदिराबाबतच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://goo.gl/xATFCx


 

  1. माऊलींच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान, टाळ-मृदुंगाच्या गजरात आळंदी दुमदुमली, तुकोबारायांची पालखी आकुर्डी मुक्कामी, एबीपी माझावर अभिनेता संदीप पाठकसह ‘माझा विठ्ठल माझी वारी’ https://abpmajha.abplive.in/


 

  1. अभिनेता रितेश देशमुखचं रायगडावरील मेघडंबरीत फोटोसेशन, चौफेर टीकेनंतर माफीनामा, तर छत्रपती संभाजीराजेंची ट्विटरवरुन नाराजी https://goo.gl/9HJnW4


 

  1. करनजीत कौर सनी लिओनी कशी बनली? बायोपिकचा ट्रेलर रिलीज, 16 जुलैला वेब सीरिज प्रदर्शित होणार https://goo.gl/wm7WaL


 

  1. 14. इंग्लंडविरुद्धच्या भारतीय वन डे संघात दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी पालघरच्या शार्दूल ठाकूरची निवड, तर दुसरा टी-20 सामना आज https://goo.gl/ikoE5o


 

  1. फिफा विश्वचषकात आज उपांत्यपूर्वी फेरीचा थरार, रात्री साडेसात वाजता उरुग्वे विरुद्ध फ्रान्स सामना तर रात्री साडे अकरा वाजता ब्राझील विरुद्ध बेल्जिअम लढत https://abpmajha.abplive.in/


 

*रिव्हूयू* : पकड सुटलेले 'यंग्राड' https://goo.gl/skDqZd

*माझा विशेष* : खासदार गोपाळ शेट्टींचं वादग्रस्त विधान : ख्रिश्चनांच्या देशभक्तीवर संशय का? विशेष चर्चा रात्री 9 वाजता

*एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*