पुणे : ग्यानबा तुकारामाचा जयघोष करत वारकरी पंढरीची वाट चालू लागले आहेत. हजारो दिंड्या या सोहळ्यात सहभागी होत आहेत. त्यातील मानाची दिंडी म्हणजे संत श्री ज्ञानोबा माऊलींची... आळंदीहून आज ज्ञानोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं.
शेकडो वारकरी या आनंदसोहळ्याचे साक्षीदार झाले. टाळ मृदुंगाचा गजर करत या पालखीचं प्रस्थान झालं. ही पालखी आज ज्ञानोबांच्या आजोळी गांधीवाड्यात मुक्कामी असणार आहे.
दरम्यान, तुकोबांची पालखीही आज पुढे निघाली आहे. इनामदार वाड्यातून ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ही पालखी आज आकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे.
वारीमध्ये फिरतं एटीएम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात महाराष्ट्रच्या विविध भागातून लाखो भाविक सहभागी होत असतात. या लाखोंच्या संख्येने असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या अनेक घटना घडतात. या चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी एका खासगी बँकेने वारीदरम्यान आळंदी ते पंढरपूर या मार्गावर फिरते एटीएम ठेवले आहे.
एटीएम सोबत असल्यामुळे वारकरीही अधिकचे पैसे जवळ न बाळगता गरजेपुरतेच पैसे जवळ ठेवत आहेत. या फिरत्या एटीएममुळे वारीत होणाऱ्या चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता हा पालखी सोहळा हळूहळू डिजीटल होऊ लागला आहे.
आळंदीहून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान, गांधीवाड्यात मुक्काम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jul 2018 06:41 PM (IST)
शेकडो वारकरी या आनंदसोहळ्याचे साक्षीदार झाले. टाळ मृदुंगाचा गजर करत या पालखीचं प्रस्थान झालं. ही पालखी आज ज्ञानोबांच्या आजोळी गांधीवाड्यात मुक्कामी असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -