शेतकरी संपासंदर्भात विरोधकांवरील आरोप पोरकट : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2017 11:47 PM (IST)
रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केलेला आरोप पोरकटपणाचे आहेत. कारण कोणत्याही राजकीय पक्षांनी आंदोलनात सहभाग नव्हता, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बोलताना सांगितलं. ''कुणीही कुठलाही राजकीय पक्ष शेतकरी संपात सहभागी नाही. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवरील आरोप पोरकटपणाचा आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यात पक्षीय अभिलाशा ठेवून, आंदोलन करण्यात अर्थ नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं या संबंधातील वक्तव्यं, त्या पदाला शोभणारं नाही,'' असं शरद पवार म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. शेतकऱ्यांच्या नावावर काही लोक राज्यात अराजक पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. संबंधित बातम्या