मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखरेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. साखर कारखान्यासाठी असलेल्या साखरसाठ्याची मर्यादा काढून टाका, साखर कारखान्याच्या कर्जांचं पुनर्गठन करावं अशी मागणी यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.


 
सध्या साखर कारखानदारांना 15 हजार क्विंटल साखरसाठा करण्याची मुभा आहे. यासंदर्भात केंद्राला विनंती करु असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं. तसा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

 
याशिवाय ऊस खरेदी कर माफ करावा अशीही मागणी आहे. या प्रश्नावर एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यात याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं.