मुंबई: गेल्या आठवड्यात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चा होती, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीची. ही महामुलाखत 21 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील घराघरात पाहिली गेली.

महत्त्वाचं म्हणजे ही मुलाखत पाहण्यासाठी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पहिली पसंती होती ती म्हणजे तुमचं लाडकं चॅनेल एबीपी माझाला!

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट अर्थात टीआरपी नोंदवणाऱ्या बार्क या रेटिंग एजन्सीने याबाबतचे आकडे जाहीर केले आहेत.

त्यानुसार महामुलाखत पाहण्यासाठी तब्बल 39 टक्के प्रेक्षकांनी एबीपी माझाला पहिली पसंती दिली.

शरद पवार आणि राज ठाकरे : महामुलाखत जशीच्या तशी

नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत, शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, विद्यार्थी ते नोकरदार वर्गापर्यंत सर्वांनी ही महामुलाखत माझावर पाहिल्याचं आकडेवारीवरुन सिद्ध झालं.

गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेने एबीपी माझावर भरभरुन प्रेम केलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अव्वल स्थानावर असलेल्या ‘माझा’ने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.

गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार एबीपी माझा 36 टक्क्यांसह पहिल्या स्थानी आहे. तर झी 24 तास 23 टक्के, टीव्ही 9- 20 टक्के, न्यूज18 लोकमतला 17 टक्के प्रेक्षकांची पसंती आहे.

त्यामुळे आम्ही नाही तर आकडेच बोलतात मराठी मनाची पहिली पसंती म्हणजेच एबीपी माझा!

संबंधित बातम्या

शरद पवार आणि राज ठाकरे : महामुलाखत जशीच्या तशी


बाळासाहेबांना अटक करताना 'आपुलकी' कुठे गेली होती : उद्धव ठाकरे


राज ठाकरेंच्या ‘रॅपिड’ प्रश्नांवर शरद पवारांची ‘फायरिंग’


आरक्षण आर्थिकदृष्ट्या असावं, मग तो कुठल्याही जातीचा असो : पवार