Sharad Pawar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोतीराम राठोड यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) खिसा कापला गेल्याचा एक किस्सा सांगितला आहे. खिसा असा कापला गेला, की मला कळालचं नाही हे देखील ते सांगायला विसरले नाहीत.


“काही वर्षांपूर्वी मी चाळीसगावमध्ये एका अधिवेशनासाठी गेलो होतो. त्यावेळी आयोजकांनी मला सांगितले की यावेळीच्या अधिवेशनाचं वैशिष्ट म्हणजे, यंदा भागातील सर्व गुन्हेगार याठिकाणी एकत्र जमले आहेत. मी त्यांना गमतीने विचारलं की या गुन्हेगारांचं असं काय वैशिष्ट आहे? ते म्हणाले, तुम्हाला हे वैशिष्ट बघायचं असेल तर ते या अधिवेशनाच्या ठिकाणीच पहायला मिळेल”.


त्यावर मी सहज गमतीने म्हटलं, गुन्हेगार जमाती यांचं काय वैशिष्ट्य आहे. त्यावर मला म्हणाले, यातं वैशिष्ट्य तुम्हाला समारंभात, अधिवेशात बघायला मिळेल. मी म्हटलं कोण लोक आहेत. त्यावर त्यांनी मला एका एकाची ओळख करून दिली. हे खिसा कापतात, हे अमुक गुन्हा करतात, ते तमुक गुन्हा करतात. ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. मी विचारलं खिसा कापतात? त्यावर ते म्हणाले हो खिसा कापतात, मी म्हटलं खिसा कापताना कळत नाही का? त्यावर मला त्यांनी सांगितलं खिश्यात हात घाला, मी माझ्या खिश्यात हात घातला तर हात खाली गेला. माझाल खिसा कधी कापला ते मला कळलंच नाही मुळात हे स्किल समाजातील काही घटकांमध्ये परिस्थितीमुळे आलं असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.






 


माझा महाकट्टा कार्यक्रमात शरद पवारांनी सांगितल्या मजेदार गोष्टी



राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज एबीपी माझाच्या माझा महाकट्ट्यावर (Majha Maha katta) हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर दिलखुलास चर्चा करत अनेक रोखठोक उत्तर दिलीत. 


बुद्धीबळाच्या पटावरील आवडता सैनिक कोण?



यावेळी शरद पवार  म्हणाले की, असंय की मी काही बुद्धीबळ फार भारी खेळतो असं नाही. गंमतीने कधी मला वेळ मिळाला तर मी खेळायला  बसतो. त्याच्यात दोन तीन गोष्टी असतात, तो म्हणजे उंट हा तिरकाच चालतो. राजकारणात कोण उंट आहे हे लक्षात ठेवावं लागतं. घोडा हा अडीच घरं चालतो, तर अडीच घरं चालणारा घोडा आपल्या आजूबाजूला कोण आहे ते बघावं लागतं. अशा शब्दात शरद पवारांनी (Sharad Pawar) उत्तर दिले आहे.


'वजीर' माझा आवडता - शरद पवार


 
दरम्यान, बुद्धीबळ खेळामध्ये असलेल्या उंट, घोडा, राजा, राणी इत्यादि पैकी तुमचा आवडता आणि कोणाला सोबत घेऊन बुद्धीबळ खेळू वाटतं, असा प्रश्न केला असता शरद पवारांनी उत्तर देत म्हणाले की, 'वजीर' हा माझा आवडता आहे.