मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या चार सर्वोत्तम पैलवानांना दत्तक घेण्याचा दिलेला शब्द अवघ्या महिन्याभरात खरा केला आहे.
राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पैलवानांसह महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या परदेशी प्रशिक्षणाचा खर्च शरद पवारांनी उचलला आहे.
शरद पवार यांनी चार पैलवानांच्या खर्चासाठी म्हणून २४ लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या प्रशिक्षकांकडे सुपूर्द केली आहे. राहुल आवारे, उत्कर्ष काळे आणि किरण भगत यांचे प्रशिक्षक अर्जुनवीर काका पवार आणि अभिजीत कटकेचे प्रशिक्षक भरत म्हस्के यांनी पवारांकडून ते धनादेश स्वीकारले आहेत. ही योजना तीन वर्षे सुरु राहिल.
महाराष्ट्रातील 4 सर्वोत्तम पैलवानांना पवारांकडून 24 लाखांची मदत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jan 2018 06:14 PM (IST)
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या चार सर्वोत्तम पैलवानांना दत्तक घेण्याचा दिलेला शब्द अवघ्या महिन्याभरात खरा केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -