मुंबई : राष्ट्रवादीच्या  (NCP) अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्य समितीत एकमताने ठराव मंजूर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियम येथे आज पार पडले. या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. 






आज कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत आदरणीय शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष  सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करू व भारतीय लोकशाही बळकट करू, असे ट्विट विकांत वरपे यांनी केले आहे. 


राष्ट्रवादीच्या दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार यांची सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाचा नव्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल ठराव मांडण्यात आला. या ठरावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजूरी देण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच आज कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.  


महत्वाच्या बातम्या


Nitish Kumar Meets Sharad Pawar: नितीश कुमार यांनी घेतली शरद पवार यांची भेट, 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर झाली चर्चा? 


बारामतीचा गड उध्वस्त करणं इतकं सोपं वाटतं का?, निलेश लंकेंचं बारामती दौरा करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर