Nilesh Lanke on Chandrashekhar Bawankule Baramati Visit : भाजपनं (BJP) मुंबईसोबतच आपला मोर्चा पवारांच्या बारामतीकडे (Baramati) वळवला आहे. काल (मंगळवारी) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामतीत येऊन शरद पवार (Sharad Pawar) यांना चॅलेंज दिलं. बारामतीसह लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं बावनकुळे म्हणाले. याआधी अनेक गड उद्धवस्त झाल्याचं सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी यावेळी केलं. बावनकुळे यांच्या याच वक्तव्याला राष्ट्रवादी आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीचा गड उध्वस्त करणं इतकं सोपं वाटतं का? कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयोग होता, असं म्हणत आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपवर पलटवार केला आहे. 


राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांनी भाजपला लक्ष्य करताना, "वक्तव्य करण सोपं असतं, कृती करणं अवघड असतं, ज्या बारामतीनं देशाला विकासाची दिशा दाखवली. राज्यात प्रत्येक झोपडीपर्यंत विकास पोचविण्याचं काम केलं. त्या बारामतीचा गड उध्वस्त करणं, हे इतकं सोपं वाटतं का? असा सवाल केला. तसेच, फक्त बोलायचं म्हणून बोलायचं. कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 


राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आज कल्याण (Kalyan) उल्हासनगर परिसरातील कार्यकर्त्यांना  भेट दिली. यावेळी त्यांनी कल्याणमधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयात आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकार संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनेक गड उध्वस्त झालेत, असा सूचक इशारा शरद पवार यांना दिला होता. तर पुढे बोलताना येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) विसर्जन करायचं आहे, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. या वक्तव्याबाबत लंके यांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे. 


आमदार निलेश लंके बोलताना म्हणाले की, बारामतीचा गड उध्वस्त करणं हे इतकं सोपं वाटतं का? फक्त बोलायचं म्हणून बोलायचं, कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा केविलवाणा प्रयोग असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाजपवर केला आहे. आमदार निलेश लंके यांनी काल रात्री उशिरा कल्याणमध्ये माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयात भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.  


बारामतीसह लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचं भाजपचं टार्गेट : चंद्रशेखर बावनकुळे


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत येऊन शरद पवारांना चॅलेंज दिलं. बारामतीसह लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं बावनकुळे म्हणाले. याआधी अनेक गड उद्धवस्त झाल्याचं सूचक वक्तव्य बावनकुळेंनी केलं आहे. आज चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर आहेत. तर यापुढे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन पाच ते सहा वेळा बारामतीत येणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली. विशेष म्हणजे पवार कुटुंबीय निवडणूक प्रचाराची सुरुवात ज्या कन्हेरी गावातील हनुमान मंदिरातून करतात, त्याच मंदिरात बावनकुळेंनी दर्शन घेतलं. त्यानंतर ते पवारांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीत आले. या ठिकाणी बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. एकीकडे अमित शाहांनी मुंबई दौऱ्यादरम्यान ठाकरेंना टार्गेट केलं. तर आता पवारांची बारामती देखील भाजपच्या निशाण्यावर आहे हे स्पष्ट झालं आहे.