YouTuber Bindas Kavya : बेपत्ता असलेली औरंगाबादची प्रसिद्ध युट्युबर बिंदास काव्या (Bindas Kavya) अखेर सापडली आहे. बिंदास काव्या ही मध्य प्रदेशमधील (Madhya pradesh) ईटारसीमध्ये पोलिसांना सापडली आहे. बिंदास बेपत्ता झाल्याने औरंगाबादमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, अवघ्या 24 तासांत पोलिसांनी काव्याचा शोध लावला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काव्या पोलिसांना मनमाडहून (manamad) लखनौला जात असताना मिळाली आहे.
यूट्युबर बिंदास काव्या काल दुपारपासून बेपत्ता होती. याप्रकरणी तिच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची दाखल करण्यात आली होती. मनमाडहून (manamad) लखनौला जात असताना पोलिसांनी काव्याला ताब्यात घेतले.
कुठे आणि कशी सापडली काव्या?
औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पाठपुरावा केल्याने आणि आरपीएफच्या मदतीने या युट्युबराला शोधण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्थानिक पोलीस , सायबर , गुनहे शाखा यांना या मुलीचा तात्काळ शोध घेण्य्याचे आदेश दिले. मुलीच्या पालकांनी दिलेले माहीती आणि सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने तपास केल्यानंतर ती महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशकडून खूप वेगाने जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे ती रेल्वेने प्रवास करत असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. त्यानुसार तपास करून रेल्वे विभागातील वरिष्ठ आधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला. यावेळी तिला शोधण्यास आरपीएफला यश मिळाले. काव्या ही रेल्वेने तिच्या लखनऊ येथील मित्राकडे जात होती. खुशीनगर एक्सप्रेस गाडीधून तिने खांडवा रेल्वे स्टेशन पास करून पुढे गेल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. सध्या पोलीस तिला घेऊन औरंगाबादकडे येत आहेत.
कोण आहे बिंदास काव्या?
यूट्युबर बिंदास काव्या ही मुळची औरंगाबाद येथील आहे. बिंदास काव्या सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. बिनधास काव्या यूट्युबर प्रसिद्ध असून, तिचे यूट्युबवर 4.32 मिलियन म्हणजेच 43 लाखापेक्षा जास्त सबक्रायबर्स आहेत. ती कालपासून गायब होती. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे अखेर छावणी पोलिसात याप्रकरणी मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात आला. शोध सुरू असतानाच ती मध्य प्रदेशमधील (Madhya pradesh) ईटारसीमध्ये पोलिसांना सापडली.