मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. येत्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आजपासूनचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं. 


दरम्यान, ब्रीच कँडीमध्ये शरद पवारांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहेत. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे शरद पवारांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.


 






अमित शाह यांची भेट घेतली होती
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीच्या वृत्तानंतर राज्याच्या आणि देशातील राजकारणात अनेक हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे, तर काँग्रेस नेत्यांनी या भेटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचंही पहायला मिळतंय.


 







महत्वाच्या बातम्या :