मुंबई : शक्ती मिल सामुहिक बलात्कार (Shakti Mill Gang Rape) प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील तिघांना हा गुन्हा पुन्हा केल्याबद्दल मुंबई सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती तर एका आरोपीला जन्मठेप दिली होती. मात्र याप्रकरणातील पाचवा आरोपी ज्याला अल्पवयीन घोषित करून कोर्टानं या खटल्यातून वेगळं करत त्याच्यावर स्वतंत्र खटला चालवला गेला. ज्युविनाईल कायद्यानं निर्धारीत कलेली नाममात्र शिक्षा भोगून हा आरोपी कारागृहातून बाहेर पडला.


मात्र बाहेर पडला तो सुधारून नाही तर एका कुख्यात गुंडाची जणूकाही डिग्री घेऊनच. आकाश जाधव असं याचं नाव. जेलमधून बाहेर पडल्यावर आकाशनं डिलाईल रोड, लोअर परेल भागात आपली दहशत माजवण्यास सुरूवात केली. त्यानं आपली स्वत:ची गँग तयार करून स्थानिक व्यापा-यांना दमदाटी करून खंडणी उकळण्यास सुरूवात केली. पाहता पाहता या गँगची दहशत या भागात पसरू लागल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आकाशच्या मुसक्या आवळल्या. अल्पवधीतच आकाशवर मारामारी, खंडणी, दहशत माजवणे, हत्येचा प्रयत्न करणे यांसारखे गुन्हे दाखल करण्यात आले. 


कोरोनाकाळाच्या आधी आकाश आणि त्याचा साथीदार अंकित या दोघांना मुंबईतून तडीपारही करण्यात आलं होतं. त्यामुळे शक्ती मिल सामुहिक बलात्कारासारख्या भयानक गुन्ह्याची शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर आकाश जाधव सुधारण्याऐवजी एका सराईत गुंडाप्रमाणे समाजात वावरू लागला. त्यामुळे खरंच अशा आरोपींना सुधारण्याची संधी देणं समाजासाठी घातक नाही का?, असा सवाल उपस्थित होतो.


Shakti Mill Case : नक्की काय होतं शक्ती मिल प्रकरण?



संबंधित बातम्या :