सातारा : राज्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री प्रतापराव भोसले यांचं आज (19 मे) सातारमध्ये निधन झाले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसोबत त्यांनी काम केले होते. कॅबिनेटमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मतक पदे भूषवली. ते काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष होते. प्रतावराव भोसले चारवेळा आमदारकी जिंकताना कमी वयामध्ये आमदार होण्याचा मान मिळवला होता. 


प्रतापराव बाबुराव भोसले यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1934 रोजी सातारा जिल्ह्यातील भुईंजमध्ये झाला. त्यांनी सातारा मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केलं. प्रतापराव भोसले 8व्या, 9व्या आणि 10व्या लोकसभेसाठी निवडून आले होते. 1967 ते 1985 पर्यंत ते वाई मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. प्रतापराव बाबुराव भोसले यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1934 रोजी सातारा जिल्ह्यातील भुईंजमध्ये झाला. त्यांनी सातारा मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केलं. प्रतापराव भोसले 8व्या, 9व्या आणि 10व्या लोकसभेसाठी निवडून आले होते. 1967 ते 1985 पर्यंत ते वाई मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. 


सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड


दरम्यान, प्रतापराव भोसले यांच्या निधनानं, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री प्रतापराव भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, माजी मंत्री प्रतापराव भोसले (भाऊ) यांनी  सातारा जिल्ह्याच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल भोसले कुटुंबियांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.


इतर महत्वाच्या बातम्या