वर्धा: हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्ध्यातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आज आत्मक्लेष उपवास करण्यात आला. यावेळी मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही करण्यात आली, असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली


सातव्या दिवशी पीडितेची प्रकृती स्थिर पण अजून ही नाजूक आहे. आज सकाळी तिच्यावर चौथी शस्त्रक्रिया केली गेली. तसेच तिच्या शरीरातील / बॉडी मधील घाण म्हणजेच स्लफ काढली गेली. त्या अंतर्गत पीडितेच्या त्वचेवर असलेली जळलेली घाण (स्लफ) काढली गेली. त्यानंतर ड्रेसिंग करून तिला पुन्हा आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. पीडितेच्या शरीरात रक्ताची कमतरता असून आज तिला रक्त दिल जाईल. जो पर्यंत पीडिता स्वतः श्वास घेऊ शकत नाही. तो पर्यंत तिला व्हेंटिलेटर सुरू राहील. दरम्यान, पीडितेला कृत्रिम फिडिंग सुरू आहे, ती आमच्यासाठी जमेची बाजू आहे. तसेच तिचा रक्तदाब आणि इतर शारीरिक पॅरामिटर्स चांगले आहे. तिचा  पुढील एक ते दीड महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर अनेक सुधार तिच्या प्रकृतीत दिसेल, अशी माहिती डॉ. डॉ दर्शन रेवनवार यांनी दिली आहे. तर पीडीता स्टेबल असली तरी हा स्ट्रेसफुल पिरियड असल्याची माहिती भुलतज्ज्ञ डॉ. नीता देशपांडे यांनी दिली.

WEB EXCLUSIVE | हिंगणघाटच्या गुन्हेगाराला काय शिक्षा द्यावी? विद्यार्थिनींचं काय मत आहे?



वर्ध्याच्या हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेष उपवास करण्यात आला. यावेळी भजन प्रार्थनाही करण्यात आली. स्वत:मध्ये सुधारणा केल्यास जग सुधरेल, असं म्हणत हा उपवास केल्या गेला. यावेळी ताई आम्हाला माफ कर असे फलक लावण्यात आले. असे पुन्हा घडू नये, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, पीडितेला कृत्रिम फिडिंग सुरू आहे, ती आमच्यासाठी जमेची बाजू आहे. तसेच तिचा रक्तदाब आणि इतर शारीरिक पॅरामिटर्स चांगले आहे. तिचा  पुढील एक ते दीड महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर अनेक सुधार तिच्या प्रकृतीत दिसेल  ती स्टेबल असली  तरी हा स्ट्रेसफुल काळ आहे.