जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने निघणारे मोर्चे पाहून सरकारवर दडपण येत असल्याची कबुली गिरीश महाजन यांनी जळगाव येथे दिली. यावेळी अतिशय तणावाच्या काळात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने आणि विश्वासाने हे प्रकरण हाताळले असे महाजन म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही अडचणीतून सहज रित्या मार्ग काढण्याची दैवी शक्ती असल्याचे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघणारे लाखोंच्या संख्येने निघणारे शिस्त बद्ध मोर्चे पाहून सरकारवर मोठे दडपण येत असल्याची जाहीर कबुली दिली. एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने जगात कुठेही असे मोर्चे निघाले नसतील. हे मोठ्या संख्येचे मोर्चे पाहिल्यावर पुढे काय होईल असे नेहमीच दडपण यायचे, असे ते म्हणाले. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी संयम आणि धैर्याने हा प्रश्न सोडविला. कोणत्याही सरकारला किंवा मुख्यमंत्र्याला सोडविता आला नसता असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविला आहे, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर विरोधकांची तोंड पाहता येत नव्हती, अशी त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. नाईलाजास्तव का होईना आरक्षणाला पाठिंबा आहे असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.
मराठा मोर्चांचे दडपण, मात्र मुख्यमंत्र्यांकडे दैवी शक्ती ! : गिरीश महाजन
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
02 Dec 2018 11:47 PM (IST)
यावेळी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही अडचणीतून सहज रित्या मार्ग काढण्याची दैवी शक्ती असल्याचे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -