1. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार, सकाळी अकरा वाजल्यापासून 'माझा'वर अर्थतज्ज्ञांसोबत सोप्या भाषेत बजेट


2. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून शेतकरी, नोकरदार वर्गाला मोठ्या अपेक्षा, गृहकर्जदारांनाही दिलासा मिळण्याची शक्यता

3. विविध बँकांच्या परीक्षा आता मराठी, कोंकणी, कन्नडसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

4. खेकड्यांमुळे चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं, अधिकाऱ्यांचा हवाला देत जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांचं अजब तर्कट, आतापर्यंत 20 मृतदेह हाती

5. उपअभियंत्यावर चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना अटक, 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा, मुलाच्या प्रतापामुळे नारायण राणेंवर माफीनाम्याची वेळ



6. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला, विधानसभेच्या तोंडावर दोन्ही नेत्यांमध्ये भेट, राजकीय चर्चांना उधाण

7. नवी मुंबईमधील 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांना कर्जमाफी मिळणार, महापालिकेचा निर्णय, 80 टक्के रहिवाशांना फायदा होणार

8.  बँकेत मोबाईलमध्ये दंग असलेल्या व्यक्तीची 1 लाख 30 हजारांची रोकड लंपास, पुण्याच्या आळेफाट्यातील बँक ऑफ महाराष्ट्र  बँकेतील घटना

9. इंदापूरमध्ये आज तुकोबांच्या पालखी दुसरं गोल रिंगण, माऊलींच्या पालखीचा फलटण तर तुकोबांच्या पालखीचा इंदापूरमध्ये  मुक्काम

10. विश्वचषकात वेस्ट इंडिजची अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात, विंडीजची विजयी सांगता तर अफगाणिस्तानचा सलग नववा पराभव