मुंबई : शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख 52 हजार 483 जणांची तर वर्धातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी 2019 योजनेची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे, अशी घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली होती.


वर्ध्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश


दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी 154 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना  2019 ची माहिती

1. एकूण अपेक्षित कर्जखती - 36.45  लाख

2.पोर्टलवर अपलोड झालेल्या खात्यांची संख्या - 34. 98  लाख खाती3

3. यादी प्रसिध्द केलेल्या खात्यांची GB संख्या -  21.82 लाख खाती,

4.  त्यासाठी लागणारी रक्कम रु  14,000 कोटी शासनाने यासाठी तरतूद केली आहे.

5. संपूर्ण यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या - 15

6. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अंशतः यादी प्रसिध्द केलेल्या जिल्ह्याची संख्या - 13

7. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने यादी प्रसिद्ध न केलेल्या जिल्ह्याची संख्या - 6

8.आत्तापर्यंत प्रमाणीकरण झालेले कर्जखाती- 72, 947

9.प्रमाणीकरण नंतर व्यापारी बँका 24 तासांमध्ये व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका 72 तासांमध्ये संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या कर्ज खात्यावर लाभ देणार आहेत.

पहिली यादी जाहीर


महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली होती. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली होती. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे.


कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद


कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद विधानसभेत आज 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आली. त्यावर आता 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे.


संबंधित बातम्या :


19 जिल्ह्यात कर्जमाफीच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायत निवडणुकांचा अडसर


39 लाख शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा फायदा, सरकारवर जवळपास 30 हजार कोटींचा भार!