सांगली जिल्ह्यातल्या पोलिसांनी डॉल्बी बंदीची हाक दिली. तब्बल 800 मंडळांनी प्रतिसाद दिला आणि डॉल्बीचा दणदणाट बंद झाला. त्यासाठी होणारा खर्च गोळा केला आणि त्यातून उभे राहिले सुखकर्ता आणि विघ्नहर्ता बंधारे.
30 मीटर लांब आणि दीड मीटर उंचीचा बंधारा मिरजेतल्या मल्लेवाडीत उभा राहिला आणि त्यामुळे अनेक वर्षांपासून दुष्काळी असलेल्या गावात सुकाळ आला.
ज्यांच्या संकल्पनेतून राज्यभरात जलयुक्त शिवारची कामं झाली. त्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बंधाऱ्यांचं आता लोकार्पण होत आहे. कानाचे फडदे फाटेपर्यंत दणदणाट करण्यापेक्षा घशाची कोरड घालवण्याचा हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात गरजेचा आहे.
VIDEO: