नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिस दलाने भरभक्कम सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन केलं आहे. विधीमंडळ परिसरावर ड्रोनची नजर असणार आहे. तर पोलिस मोर्चे हाताळताना बॉडी कॅमेरे वापरणार आहेत.


एवढच नव्हे तर अधिवेशनासाठी 6 हजार 500 पोलिस आणि 800 अधिकारी तैनात असतील. गेल्या वर्षीच्या लाठीचार्जच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी ही विशेष योजना आखली आहे.

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 5 ते 17 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार आहे. या काळात विविध मागण्यांसाठी मोर्चे नागपुरात दाखल होतात. मात्र पोलिसांनी मोर्चे हाताळण्याची तयारी यावर्षी अगोदरच करुन ठेवली आहे.

गेल्या अधिवेशनात पोलिसांना मोर्चावर लाठीमार करावा लागला होता. अशा घटना टाळण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. शिवाय पोलिसांकडे बॉडी कॅमेरे असल्यामुळे सर्व घटनांवर बारीक नजर ठेवता येईल.