मुंबई : भगवान गडासाठी सरकारकडून 3 कोटी 1 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गडावरील अतिथी विश्रामगृहाचं काम करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.


अतिथी विश्रामगृहाच्या कामाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मंजूर केलेल्या निधीच्या निविदाही काढण्यात आल्या असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

दसरा मेळाव्यापासून भगवान गड चांगलाच चर्चेत आला होता. गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील वादामुळे पंकजांना गडाच्या पायथ्याशी सभा घ्यावी लागली होती. मात्र गडाच्या विकासासाठी आपण नेहमी तत्पर राहू, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.