औरंगाबादमध्ये शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 09:14 AM (IST)
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. कन्नड तालुक्यातील देभेगावात ही घटना घडली आहे. पॉलिथिनवरुन पाय घसरून देवळाणा येथील दोन विद्यार्थी शेततळ्यात पडले. मात्र पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही विद्यार्थी 14 वर्षांचे होते. कन्नड तालुक्यातील देभेगाव बोरसर रस्त्यावर असलेलं हे शेततळं पाहण्यासाठी विद्यार्थी गेले होते. समाधान वाल्मीक बोडखे आणि नामदेव संदीप मालोदे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचं नाव असून दोघेही देवळाणामधील गणेश विद्यालयात नववीत शिकत होते.