Maharashtra School Reopen : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन वर्ष शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थांचं ऑनलाइन शिक्षण सुरु झालं होतं. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण दक्षिण आफ्रिकेत आढलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यानं सावध पवित्रा घेताला आहे. मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पण महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील शाळा आजपासून सुरु होणार आहेत.
शाळांमध्ये विद्यार्थांना कोरोना नियमांचं पालन सक्तीचं करण्यात आलं आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचं पालन करणं विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना करावं लागणार आहे. राज्यातील ग्रामिण भागातील शाळांमध्ये विद्यार्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पालक आपल्या पाल्यांना घेऊन शाळेत आले होते. काही ठिकाणी ढोल ताश्यांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. तर काही ठिकाणी फुगे-चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. पाहूयात राज्यात कुठे-कुठे शाळा सुरु झाल्या आहेत..
नंदूरबार जिल्ह्यातील 1855 प्राथमिक शाळा आजपासून सुरू.....
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा आज श्री गणेशा झालाय. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधान होते सकाळीच विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांची लगबग दिसून आली तर शाळा प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यांचा स्वागताची तयारी करण्यात आली होती विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येत होती त्याच्यासोबत पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येत होते जिल्ह्यात 1855 शाळांमध्ये एक लाख 88 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आजपासून दोन वर्षाचा खंडानंतर आपल्या शिक्षणाला सुरुवात करत आहेत एकूणच प्रशासनाच्या वतीने योग्य ती काळजी घेतली जात आहे शिक्षकांनाही लसी दोघी डोस सक्तीचे करण्यात आले आहे.
शाळांमध्ये पुन्हा एकदा सुरू झाला किलबिलाट -
चंद्रपूर जिल्ह्यात आज तब्बल पावणे 2 वर्षांनंतर प्राथमिक शाळेत पुन्हा एकदा किलबिलाट सुरू झाला आहे. आजपासून जिल्ह्यात कोविड खबरदारी घेत वर्ग 1 ते 4 च्या 2417 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 121226 विद्यार्थी शिकताहेत. प्राथमिक शाळेतील या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा थेट शिक्षणाच्या प्रवाहात आणणे पालका-शिक्षकां पुढे आव्हान असणार आहे. काही शाळांनी शाळा दोन सत्रात राबविण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी अशी व्यवस्था केली आहे. या पुढच्या काळात या सर्व कोविड खबरदारीचे काय परिणाम दिसतील याकडे पालक-शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पहिली ते चौथीच्या शाळा उघडणार आहेत. जवळपास पावणेदोन वर्षानंतर शाळांमध्ये लहानग्यांचा किलबिलाट होणार आहे. जिल्ह्यात 2 हजार 522 शाळांमध्ये आज घंटा वाजणार आहे. जवळपास 46 हजार विद्यार्थी शाळेत लावणार हजेरी
एकवीस महिन्यानंतर जळगावमध्ये आजपासून शाळा भरणार
मागील काळात कोरोना चे पार्शवभूमीवर गेल्या एकवीस महिन्या पासून प्राथमिक शाळा बंद राहिल्या होत्या मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं दिसून आल्यावर शासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णय नुसार आज जळगाव जिल्ह्यात आज प्राथमिक शाळा सुरू होत आहेत आज पहाटे पासूनच शाळा प्रशासन विद्यार्त्यान चया स्वागत साठी सज्ज असल्याचं दिसून आले आहे एककडे शाळा सुरू होण्याचा आनंद विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मधे दिसून असताना कोरोनचा तिसऱ्या लाटेचा धोका पाहता त्याचा प्रसार होऊ नये या साठी शाळा प्रशासन शासनाच्या नियमनुसर मास्क ,सनी टाई झर,सोशल दिस्टांस सिंग पालन करून विद्यार्त्याना प्रवेश दिला जात आहे. यावेळी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प ,ढोल ताशे आणि मिठाई देऊन केले असल्याचं पाहायला मिळाले आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी ,शिक्षक आणि पालक यांच्या मधे मोठा उत्साह असल्याचं दिसून आले आहे.
धुळे जिल्ह्यात पहिली ते सातवीच्या शाळा सुरू विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्साह
राज्य सरकारने दिनांक 1 डिसेंबर पासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत, धुळे जिल्ह्यात देखील शाळांना सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला, शहरी भागात 177 ग्रामीण भागात 1 हजार 370 शाळा सुरु झाल्या. सुरुवातीचे काही दिवस फक्त तीनच तास शाळा सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असून शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे तसेच विद्यार्थी आणि पालकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील 13 डिसेंबर ला शाळा सुरू होणार
राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग 1 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात येणार होते. नांदेड जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहिम 12 डिसेंबर 2021 पर्यंत राबवून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचा आढावा घेऊन 13 डिसेंबर 2021 पासून ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी व शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांचे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी याबाबत आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतच्या आवश्यक त्या सूचना संबंधितांना करण्याचे निर्देश दिले. साथरोग अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन विभाग मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार ज्या वर्गाची शाळा सद्यस्थितीत सुरु आहे ती पूर्वी प्रमाणेच सुरु राहतील. परंतू शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे प्रथम किंवा द्वितीय डोस झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच 13 डिसेंबर पासून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या घरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री शालेय प्रशासनाने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.