नागपुरात शालेय पोषण आहारात अळ्या तर गोंदियात मृत वटवाघळाचं पिल्लू, चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2019 02:17 PM (IST)
या दोनही घटना धक्कादायक असून हा नक्की पोषण आहार आहे की शोषण आहार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
नागपूर/गोंदिया : महाराष्ट्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला आहे. नागपुरात प्राथमिक शाळेतल्या पोषण आहारातल्या भातात अळ्या सापडल्या आहेत. तर गोंदियातल्या पोषण आहाराच्या मसूर डाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचं पिल्लू आढळलं आहे. या दोनही घटना धक्कादायक असून हा नक्की पोषण आहार आहे की शोषण आहार असा प्रश्न उपस्थित होतो आहे. गोंदियात डाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचं पिल्लू गोंदियातल्या पोषण आहाराच्या मसूर डाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचं पिल्लू आढळल्याचं समोर आलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील बिजेपार येथील घटना आहे. गर्भवती महिला आणि लहान मुलांना या पोषण आहाराचं वाटप केलं जातं. मायरा वाघमारे या मुलीला देण्यात आलेल्या मसूर डाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचं पिल्लू सापडलं आहे. त्यामुळे अंगणवाडीतील पोषण आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. VIDEO | गोंदियात शालेय पोषण आहाराच्या मसूर डाळिच्या पाकिटात मृत वटवाघळाचं पिल्लू | ABP Majha नागपुरात पोषण आहारातल्या भातात अळ्या नागपुरात प्राथमिक शाळेतल्या पोषण आहारातल्या भातात अळ्या सापडल्या आहेत. प्रतापवनगरमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतला हा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला आहे. सौरभ महिला विकास मंच या बचत गटाकडून शालेय पोषण आहाराचा पुऱवठा केला गेला होता. आहारात अळ्या सापडल्याचं वेळीच लक्षात आल्यानं कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागले नाही. आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी केली आहे. VIDEO | नागपूरच्या प्रतापनगरमध्ये शालेय पोषण आहारात अळ्या | ABP Majha