औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत विदर्भातील उमेदवारांचा समावेश असणार आहे. विदर्भातील उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी केल्याचं दिसत आहे.

एकीकडे काँग्रेसची वंचित आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत आघाडीची चर्चा सुरु असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व जागांकरता तयारी देखील सुरु केली आहे.

VIDEO | वंचित आघाडीतून प्रकाश आंबेडकरांनाच हटवण्याच्या हालचाली | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूकीची पुर्वतयारी म्हणून इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. 13 ते 16 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर मराठवाड्यातील मतदारसंघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर मुलाखती वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटर्री बोर्ड सदस्य अॅड अण्णाराव पाटील, अशोकभाऊ सोनोने आणि रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतल्या जाणार आहे.

VIDEO | विधानसभेसाठी 288 पैकी 40 जागा काँग्रेसला देण्याचा वंचित आघाडीचा प्रस्ताव | एबीपी माझा



मराठवाड्याकरीता मुलाखतींचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

उस्मानाबाद - 21 जुलै 2019

बीड - 22 जुलै 2019

लातूर - 23 जुलै 2019

नांदेड - 24 जुलै 2019

हिंगोली - 25 जुलै 2019

परभणी - 26 जुलै 2019

औरंगाबाद - 27 जुलै 2019

जालना - दि.28 जुलै 2019

वरील तारखेला प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी सकाळी 10.00 वाजता पासून मुलाखती घेण्यात येतील.