गडचिरोली : गडचिरोलीमध्ये 35 वर्षीय महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत लिपिक असलेल्या महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली.


35 वर्षीय चंद्रप्रभा अप्पलवार यांची हत्या झाली असून प्रेमसंबंधांतून त्यांचा जीव घेण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील कारवाफा गावातील त्या मूळ रहिवासी होत्या. चंद्रप्रभा जिल्हा परिषदेत लिपिक म्हणून कार्यरत होत्या.

चंद्रप्रभा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यानंतर पोटेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोर नदीच्या पात्रात चंद्रप्रभा यांचा मृतदेह आढळला.

चंद्रप्रभा अप्पलवार यांची हत्या प्रेमसंबंधांतून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण आणि आरोपी याविषयी कोणतीही माहिती नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.