नाशिक : छेडछाडीला कंटाळून एका शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. नाशिकमधील सिन्नरमधील ही घटना आहे. या प्रकरणी दोन संशयित तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे,

 

पायल ईश्वरसिंह सोलंकी असं मृत मुलीचं नाव असून ती 15 वर्षांची होती. पायलची आई शिक्षिका आहे.

 

दीड वर्षांपासून गल्लीतील दोन तरुण पायलला त्रास द्यायचे, अशी तक्रार वडिलांनी पोलिसात दाखल केली होती. इतकंच नाही तर 15 वर्षांपूर्वी तिची शाळाही बदलल्याचं वडिलांनी सांगितलं होतं.

 

या प्रकरणी रोहित पाटील आणि नागेश गोसावी या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.