मंगळवेढ्यात स्कूल बस उलटली, 35-40 विद्यार्थी गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम | 01 Apr 2017 08:55 AM (IST)
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात स्कूल बसचा अपघात झाला आहे. जुनोनी माध्यमिक हायस्कूलची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना उलटली. नंदेश्वर ते जुनोनी मार्गावर ही दुर्घटना घडली. या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला असून, स्कूल बसमधील 35 ते 40 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.