स्कॉलरशीपमध्ये दुसरा, दहावीत 94 टक्के मिळवणारा चोर
एबीपी माझा वेब टीम | 22 Apr 2016 11:38 AM (IST)
कोल्हापूर : प्रत्येकाकडे असलेली बुद्धिमत्ता ही दुधारी शस्त्रासारखी असते. तिचा वापर कोण कसा करेल, हे सांगता येत नाही. दहावीला 94 टक्के गुण मिळवणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाला घरफोडीच्या प्रकरणात कोल्हापुरात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दहा घरफोड्या आणि 2 मोटारसायकल चोरणाऱ्या या तरुणाला दहावीत चक्क 94 टक्के गुण मिळाले होते. तसंच चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तो राज्यात दुसरा आला होता. निव्वळ चैनीसाठी म्हणून तो चोरी करत असल्याचं उघड झालं. 19 वर्षीय आरोपीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 11 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.