पुणे : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गुरुवारी पुण्यातील 'आभाळमाया' वृद्धाश्रमाला भेट दिली. विराटने तिथल्या ज्येष्ठ नागरिकांची आपुलकीने चौकशी केली. कोहलीच्या भेटीने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक हरकून गेले.


 

विराट कोहली फाऊंडेशन आणि एबीआयएल फाऊंडेशनच्या वतीने या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करण्यात आली. सिंहगड रोडवरील 'आभाळमाया' वृद्धाश्रम हे सध्या 57 ज्येष्ठ नागरिकांचं घर आहे. डॉ. अपर्णा देशमुख यांनी या वृद्धाश्रमाची स्थापना केली.

 

डॉ. अपर्णा वृद्धांसाठी करत असलेलं काम कौतुकास्पद आहे. वृद्ध पालकांना घरापासून दूर करणं दुर्दैवी आहे. घरातील ज्येष्ठ माणसांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मत यावेळी विराट कोहलीने व्यक्त केलं.