Kolhapur News : स्वाभिमानी विद्यार्थी परीक्षेचे अध्यक्ष सौरभ राजू शेट्टी यांना इचलकरंजी येथील गावभाग पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं आहे. डीकेटीई कॉलेजसमोर कालपासून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. इचलकरंजी येथील डीकेटीई महाविद्यालय आणि स्वाभिमानी विद्यार्थी परिषद यांच्यात काल झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यामुळे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या सौरभ शेट्टी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली होती. नापास विद्यार्थ्यांची तीनवेळा परीक्षा घ्यावी, तसेच झालेल्या परीक्षेची साॅफ्ट काॅपी मिळावी, अशा प्रमुख मागण्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून डीकेटीईकडे करण्यात आल्या आहेत. मात्र, डीकेटीईने आजही झालेल्या चर्चेत नकार दिला आहे. 


आंदोलन मागे न घेतल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा महाविद्यालयाकडून देण्यात आला होता. त्यानंतर गावभाग पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवताना सौरभ शेट्टी यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. 


दरम्यान, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सौरभ शेट्टी यांनी आंदोलन केले होते. यावेळी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्याची बाजू समजावून घेतली होती. मात्र, शिवाजी विद्यापीठाने स्वायत्त शिक्षण संस्थांचा संबंध थेट युजीसीसोबत असल्याने यासंदर्भात माहिती घेऊन डीकेटीई महाविद्यालयास पत्र पाठवण्याची आश्वासन दिले होते. तसेच परीक्षेसंदर्भात सर्वस्वी निर्णय त्या स्वायत्त महाविद्यालयाचा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सौरभ शेट्टी यांनी घेतला होता. 


डिकेटीई शिक्षण संस्था स्वायत्त आहे. त्यामुळे या संस्थेतंर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा महाविद्यालयातंर्गत घेतल्या जातात. संस्था स्वायत्त असल्याने जे विद्यार्थी नापास होतात त्यांना वर्षातून तीनवेळा परीक्षा देण्याची परवानगी असते. परंतु, डिकेटीई तीनवेळा परीक्षा घेत नसल्याने विद्यार्थी नापास होऊन वर्ष वाया जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून तीनवेळा परीक्षा घेण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या