कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त चांगलेच वातावरण तापू लागले आहे.

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना भाजपसोबत घेऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नांचा काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

दुसऱ्या पक्षाचे उमेदवार घेऊन सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहू नये असा टोला सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादांना लगावला.

भाजपातील 25 वर्षांपासून काम करणाऱ्यांना घेऊन सत्ता स्थापन करून दाखवावी, त्यांचा बिंदू चौकात जाहीर सत्कार असू, असं आव्हान सतेज पाटलांनी दिलं.