Satej Patil : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआने विजय मिळवला असून काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा जवळपास 18 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. दरम्यान कोल्हापूरात मविआ सरकार झाल्यापासून तसंच त्याआधीपासून काँग्रेस पक्षाचा मोठा चेहरा म्हणून प्रसिद्ध पालकमंत्री सतेज पाटील यांनी विजयानंतर आनंद साजरा करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरने पुन्हा एकदा भाजपाला मात दिली असून हाच कोल्हापूर पॅटर्न देशभरात राबवू असं सतेज यांनी म्हटलं आहे.


भाजपच्या विखारी प्रचाराला कोल्हापूरनं विचारी उत्तर दिलं असं म्हणत सतेज यांनी भाजपने अत्यंत चूकीच्या प्रकारे प्रचार केला पण तरीही अखेर विजय महाविकास आघाडीचाच झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी असल्याने इथे समतेचा संदेश दिला जातो. तसंच योग्य नियोजन केल्यास भाजपला पराभूत केले जाऊ शकते असं ते म्हणाले. 2019 मध्ये देखील कोल्हापूरने भाजपला पराभूत केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मविआने हीच कामगिरी केली असल्याने कोल्हापूर पॅटर्न देशाभरात राबवून भाजपला पराभूत केले जाऊ शकते, असं सतेज यांनी म्हटलं आहे.  तसंच हा विजय मविआतील सर्व पक्षांचा मिळून असल्याचंही सतेज यांनी म्हटलं आहे.


कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा


- 2009 साली छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले 


- राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला


- 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले


- त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते


- तर 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते



संबंधित बातम्या



Satej Patil : सतेज पाटलांचा झंझावात, कोल्हापूर भाजपमुक्त! 2015 पासून एकही पराभव नाही


Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय


Kolhapur North By Election Results 2022 : जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव