Sanjay Raut Live : मशिदीत लाऊडस्पीकरबाबत महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण आता चांगलेच तापले आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे, दरम्यान कोल्हापूर पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला असून तेविसाव्या फेरीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 3337 मते तर सत्यजीत कदम यांना 2531 मते मिळाली. या फेरीत जयश्री जाधव यांना 806 मतांची आघाडी मिळाली आहे. तेविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 16,331 मतांनी आघाडीवर आहेत. तर कोल्हापूरमध्ये भाजपचा पराभव पाहायला मिळाला आहे. यावर संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊतांचा भाजपा, राज ठाकरेंवर निशाणा
"नाशिक रामाची भूमी आहे, पण काही लोक हनुमान चालीसा म्हणण्यासाठी पुण्याला गेले, काहींनी भाढ्याने हिंदुत्व घेतले, कोल्हापूर पोट निवडणूक मध्ये जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरविले, भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, कोल्हापूरकरांनी विरोधकांचे भोंगे खाली उतरवलेत, हिजाब वादानंतर आता हनुमानावरून राजकारण सुरू आहे. भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, हजारो शिवसैनिक मातोश्रीसमोर उभे आहेत. हिंदुत्व कोणाला शिकवताय. आज पाहिलं असेल कोल्हापूरचा निकाल लागला. या निवडणुकीला सुरुवात झाली, त्याच वेळी काही लोकांनी भोंगे हनिमान चालिसाचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत. त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा कोल्हापूरला झाला नाही. एमआयएमकडून भाजप जे राजकारण करू इच्छित आहे. त्याचा दाखला कोल्हापूरच्या निवडणुकीत मिळाला. शिवसेना प्रमुखांची कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण लोकं असं स्वीकारत नाहीत. या भोंग्यांच्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळलं आहे. त्यामुळे आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचं राजकारण संपलं आहे" असे सांगत संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
आयएनएस विक्रांत : रक्कम कितीही असो पण तुम्ही घोटाळा केलाय
राऊत पुढे म्हणाले, आयएनएस विक्रांतला वाचविण्यासाठी मोहीम सुरू झाली, त्या मोहिमेत आम्ही सर्वजण होतो, लोकांनी पैसे दिले, पण ते राज भवनापर्यंत पोचले नाहीत, 2022 मध्ये राज भवनाकडून माहिती आली त्यातून गुन्हा दाखल केला. रक्कम कितीही असो पण तुम्ही घोटाळा केलाय, न्यायाचा दिलासा घोटाळा देखील सुरू आहे. केवळ केंद्रीय यंत्रणा नाही तर न्यायव्यवस्था देखील दबावाखाली सुरू आहे असे आज बोलण्याची वेळ येतेय.
हिंदुत्ववादी aimim चालणार नाही : संजय राऊत
कोणताही तणावाचा मुद्दा निवडणुकीत चालला नाही, हिंदुत्ववादी एमआय़एएम चालणार नाही, भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही, भोंगे तुमचे आहेत मात्र आवाज कोणाचे हे माहीत आहे, भोंग्याचे राजकारण आजच संपले असे राऊत म्हणाले. रामनवमीच्या दिवशी 10 राज्यात दंगली झाल्या, उत्तर प्रदेश निवडणूक वेळी हिजाब मुद्दा आला नंतर नवीन मुद्दा आला, अनेकांना राष्ट्रगीत, वंदे मातरम म्हणता येत नाही. यांनी हनुमान चालिसाचे दोन ओळी तरी म्हणून दाखवाव्यात
भाजप निराशा वैफल्य ग्रस्त - संजय राऊत
भाजप निराशा वैफल्य ग्रस्त आहे, सत्ता येत नाही, आमदार फुटत नाही, म्हणून काही लोकांना सुपाऱ्या दिल्यात. नवं हिंदू ओवेसी आणि खरा ओवेसी यांच्यांत दंगली घडवायचा आणि राष्ट्पटी राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करायचा असे आरोप राऊतांनी विरोधकांवर केले आहेत.