14 लाखांच्या हजार-पाचशेच्या नोटा चोरीला, तरुणाचा बनाव उघड
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2016 07:34 PM (IST)
सातारा : एटीएममध्ये पैसे भरायला गेलेल्या तरुणाने 14 लाख रुपयांची चोरी झाल्याचा बनाव केल्याचं उघड झालं आहे. साताऱ्यातल्या कोरेगावमधील घटनेत खोटारडेपणा करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. साताऱ्यातील कोरेगावमध्ये एटीएममध्ये पैसे भरायला गेलेल्या तरुणाने आपल्याकडील 14 लाख रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचा बनाव रचला. चोरीला गेलेल्या सर्व नोटा एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा असल्याची माहिती आहे. पोलिसांनी 14 लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. त्याचप्रमाणे चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.