साताऱ्यात जिवंत मगरीवर बसून तरुणाचा सेल्फी
एबीपी माझा वेब टीम | 18 Jul 2016 07:32 AM (IST)
सातारा : सेल्फीप्रेमींचा उतावीळपणा अनेकदा त्यांच्या जीवावर आला आहे. मात्र तरीही सेल्फीचं फॅड कमी होताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला. कण्हेर धरणाच्या परिसरात मगर असल्याचं गावकऱ्यांना समजलं. यावेळी तरुणांनी मगर पाहण्यासाठी धाव घेतली. यावेळी सुस्त पडलेल्या मगरीसोबत अनेकांनी टिंगल टवाळ्या सुरु केल्या. कोणी मगरीला हात लाऊन हूसकवत होतं तर कोणी सेल्फीची हौस पुरवून घेतं होतं. एका दीड शहाण्यानं तर कमालच केली. चक्क मगरीवर बसून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका तरुणाच्या हाताला गंभीर जखमही झाली आहे. दरम्यान अशा स्टंटबाजीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून होऊ लागली आहे.